इचलकरंजीतील कुडचे मळा परिसरातला दारू अड्डा नागरिकांनी केला उद्ध्वस्त

इचलकरंजी - शहरातील कुडचे मळा परिसरात काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे दारू अड्डा सुरू होता. या ठिकाणी दररोज मद्यपींची वर्दळ वाढली होती. भरवस्तीमध्ये दारू अड्डा असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत होता. काही मद्यपी नशेत महिलांची छेड काढत असल्याचीही माहिती समोर आली होती.
पोलिसांना वारंवार कळवूनही योग्य ती कारवाई झाली नव्हती. याची दखल घेत स्वतः आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी अचानक कुडचे मळा परिसराला भेट दिली. यावेळी आमदारांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी दारू अड्ड्याची तोडफोड करत दारूच्या बाटल्या आणि साहित्य उद्ध्वस्त केलं. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती.