माणगांव येथील युवकाची आत्महत्या

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथील युवक भरत भूपाल बन्ने याने आत्महत्या केली आहे. ३२ वर्षीय भरत याने राहत्या घरी तुळईला ओढणीचा गळफास लावून आपला जीव संपवला आहे.
भरत हा माणगांव फाटा येथे केशकर्तनाचे दुकान चालवित होता. दुकानात मेहूणा ऋत्विक, यास बसवून घरी जाऊन येतो असा निरोप देवून तो घरी गेला. खूप काळ भरत दुकानाकडे परतला नसल्याने मेहुणा ऋत्विक संजय संकपाळ यांनी घरी जाऊन पाहिले असता भरत याने आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले.
याबाबत पोलीस पाटील करसिध्द जोग यांनी हातकणगंले पोलीस स्टेशनला ही माहिती दिली. त्यानंतर अंमलदार डिसोजा हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. आत्महत्त्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सहाय्यक फौजदार सुरजित चव्हाण अधिक तपास करत आहेत. भरत बन्ने याच्या पश्चात पत्नी व नातेवाईक असा परिवार आहे.