कफ सिरप बनवणाऱ्या ‘त्या’ कंपनीच्या मालकाला अटक...
सिरपची चाचणी कडक करण्याचे केंद्राकडून निर्देश

नवी दिल्ली - कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये विषारी रसायन आढळल्याचा आरोप झाल्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये कफ सिरप विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यानंतर हे कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला आज अटक करण्यात आली आहे.
याची दखल आता जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताकडे या सिरमबाबत स्पष्टीकरण मागितले आहे तसेच निर्यात तपासण्यास सांगितले आहे. खबरदारीच्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कफ सिरपची चाचणी कडक करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच अनेक कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.