सर्वाधिक भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर

 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल 

<p>सर्वाधिक भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर</p>

मुंबई – देशातील २०२३ या वर्षातील एकूण भ्रष्टाचाराचा आकडा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिध्द केला आहे. या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
त्यानुसार , देशभरात एकूण 2 हजार 875 भ्रष्टाचाराचे सापळे रचण्यात आले, यापैकी सर्वाधिक 795 कारवाया महाराष्ट्रात करण्यात आल्या... संपूर्ण देशातील कारवाईपैकी 28 टक्के सापळे हे महाराष्ट्रातच रचण्यात आले. त्यात 785 शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना अटक केली आहे...महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या, कर्नाटक तिसऱ्या, तर गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे.