गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री प्रकरणात आरोपीस अटक

<p>गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री प्रकरणात आरोपीस अटक</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या मोहिमेअंतर्गत अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांना मिळालेल्या गोपनीय नुसार त्यांच्या पथकाने गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत उचगाव ते गडमुडशिंगी रस्त्यालगत गांजासदृश अंमली पदार्थांची विनापरवाना व बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई केली. या कारवाईत रमेश दादासो शिंदे (वय ४८, रा. ई-३८, स्वामी समर्थ कॉलनी, तिसरा बस स्टॉप, विक्रमनगर, कोल्हापूर) याला अटक करण्यात आलीय. त्याच्या ताब्यातून एकूण ७७,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मालामध्ये गांजासदृश अंमली पदार्थांचाही समावेश आहे.


ही कारवाई पो.उ.नि. इम्मन मुल्ला, सहा. फौजदार समीर सनदी, सहा. फौजदार दिनकर शेळके, पो.हे.कॉ. ४६५ दिंगबर रसाळ, सागर कोळी, अभिजीत कोळी, प्रतीक शिंदे,  मिलिंद टेळी या पथकाने केली.