धक्कादायक : सहाय्यक पोलीस महासंचालकांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या...

चंदीगढ - हरियाणाचे सहाय्यक पोलीस महासंचालक वाय. पूरन कुमार यांनी चंदीगढमधील त्यांच्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
वाय. पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी आहे. त्यांच्या पत्नी सध्या हरियानाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या आहेत. पूरन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पूरन यांचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे.