हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब कुटुंबाविरुद्ध लूकआउट नोटीस जारी…२० गुन्हे दाखल

मुंबई – प्रसिध्द हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब, त्यांचा मुलगा अनस हबीब आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी १०० हून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या जावेद हबीब त्याच्या कुटुंबासह पळून गेला आहे. पोलिस पथके दिल्ली आणि मुंबईतील ठिकाणांवर छापे टाकण्याच्या तयारीत आहेत, तर कुटुंबाविरुद्ध पोलिसांनी आता लूकआउट नोटीस जारी केली आहे.
२०२३ मध्ये, संभळच्या सरायट्रेन परिसरातील रॉयल पॅलेस वेंकट हॉलमध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम FLC या नावाने आयोजित करण्यात आला होता. जावेद हबीब स्वतः आणि त्यांचा मुलगा अनस हबीब हे स्टेजवर उपस्थित होते. हबीबने सुमारे १५० उपस्थितांना आश्वासन दिले की जर त्यांनी त्यांच्या FLC कंपनीत गुंतवणूक केली तर त्यांना ५० ते ७५ टक्के परतावा मिळेल. त्यांनी अनेकांना आमिष दाखवले. १०० हून अधिक लोकांनी FLC मध्ये ५ ते ७ लाख रुपये जमा केले. ही गुंतवणूक Binance Coin आणि Bitcoin च्या नावाने करण्यात आली होती, पण काही महिन्यांतच कंपनी गायब झाली.
एक वर्ष उलटले, पण गुंतवणूकदारांना कोणताही नफा मिळाला नाही. लोक वारंवार कंपनीच्या कार्यालयात आणि हबीब सलूनला भेट देत होते. गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा कंपनीने टाळाटाळ केली आणि काही दिवसांतच कंपनी बंद पडली आणि जावेद हबीब त्याच्या कुटुंबासह पळून गेला. त्याच्या नावावर नोंदणीकृत असलेले संभळ येथील कार्यालय आता बंद आहे