शाहू मार्केट यार्ड मधील अडत दुकानात 60 लाखांची चोरी...

<p>शाहू मार्केट यार्ड मधील अडत दुकानात 60 लाखांची चोरी...</p>

कोल्हापूर - शाहू मार्केट यार्ड येथील अरुण शंकर चौगले यांच्या अडत दुकानाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यानं गुरुवारी रात्री दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यानी दुकानात ठेवलेल्या तिजोरीतील 60 लाख रुपयांची रोकड लपास केलीय. याप्रकरणी अरुण चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, अरुण शंकर चौगले हे गुळ व्यापारी रुईकर कॉलनी परिसरात राहतात.  त्यांचे शाहू मार्केट यार्ड इथं शंकर चौगले नावाने अडत दुकान  आहे. गुरुवारी सायंकाळी अरुण चौगले हे अडत दुकान बंद करून घरी आले. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानं चौगले यांच्या दुकानाच्या खिडकीचे गज कापून दुकानात प्रवेश केला. अज्ञात चोरट्याने दुकानातील तिजोरीत ठेवलेली 60 लाख रुपयांची रक्कम लंपास केलीय. अरुण चौगले हे आज सकाळी दुकान उघडण्यासाठी दुकानात गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.दरम्यान, अरुण चौगले यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.