सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या नोंदणीत महाराष्ट्र राज्य प्रथम
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल जाहीर

मुंबई – देशातील सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक नोंदणीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आल्याचा अहवाल राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिला आहे.
अहवालातील बहुतांश प्रकरणे आर्थिक फसवणूकीशी निगडीत आहेत. सायबर गुन्ह्यांची एकूण ८६ हजार ४२० प्रकरणे राज्यात नोंदवली गेली आहेत. यात ३१ टक्क्यांनी वाढ झाली. यापैकी ५९,५२६ (६८.९) टक्के प्रकरणे ही आर्थिक फसवणूकीशी निगडीत होती.
देशभरात २०२३ या वर्षांत ६२.४१ लाख दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. यापैकी ३७.६३ लाख गुन्हे भारतीय दंड संहिते अंतर्गत तर २४.७८ लाख गुन्हे हे विशेष स्थानिक कायद्यांतर्गत नोंदवले गेले. २०२२ च्या तुलनेत एकूण सरासरी गुन्ह्यांत ७.२% वाढ झाली. राज्यातील गुन्हेगारीचा दर लाख लोकसंख्ये मागे ४२२.२ वरून ४४८.३ वर वाढला.
देशातील मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, सारख्या १९ महानगरांमध्ये एकूण ९ लाख ४४ हजार २९१ दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले.