कणकवली वन विभागाची मोठी कारवाई...

वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

<p>कणकवली वन विभागाची मोठी कारवाई...</p>

कोल्हापूर -  कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील यांना वाघाची नखं आणि दात विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे कणकवली वनविभागाच्या पथकानं सापळा रचून एक तोतया ग्राहक पाठवत चार संशयितांना जेरबंद केले आहे. विजय हळदीवे, कृष्णात रेपे, तौफीक सनदी आणि परशुराम बोधले अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून बिबट्याची बारा नखं, चार दात आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयितां विरोधात विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.