जयसिंगपुरात चरस विक्री करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत...

<p>जयसिंगपुरात चरस विक्री करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत...</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे हा उमळवाड फाटा परिसरात चरस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिलीप कांबळे याला अटक केली.

यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडं सदतीस ग्रॅम चरस आणि इतर साहित्य असा एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. दिलीप कांबळे वर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप कांबळे विरोधात यापूर्वीही शिवाजीनगर, शाहूपुरी, राजारामपुरी आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत ४ गुन्हे दाखल आहेत. जयसिंगपूर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.