आंदोलन मागे घेण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागितली; मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पन्हाळा उपविभागीय निबंधक वर्ग-१ कार्यालयात २०२१ पासून आजतागायत तुकडाबंदी आदेश असतानाही मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होत असून, त्यामार्फत बेकायदेशीर संपत्ती जमवली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी दिला होता. आंदोलन मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयाची मागणी पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली होती.शासकीय विश्रामगृह पन्हाळा येथे तडजोडीसाठी मिटींग बोलावुन दोन लाख रुपयाची वारंवार मागणी करत असलेबाबत पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक रुपगंधा संतोष खोत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष विशाल मोरे, लखन लादे संजय पाटील, तुषार चिकुर्डेकर यांच्या वर आंदोलन मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयाची खंडणी मागणी केल्या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे