खोतवाडीत किरकोळ कारणातून चाकू हल्ला…हल्ल्यात पिता - पुत्र गंभीर जखमी

सख्खे शेजारी…पक्के वैरी

<p>खोतवाडीत किरकोळ कारणातून चाकू हल्ला…हल्ल्यात पिता - पुत्र गंभीर जखमी</p>

इचलकरंजी - खोतवाडीतील अयोध्यानगर परिसरात राहणाऱ्या श्रेयस आणि मंजिरी जोशी या दांपत्याचा शेजारी राहणारे अक्षय गौरोजी यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरुन वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की श्रेयस जोशी याने अक्षय गौरोजी यांच्यावर हल्ला केला. दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी गेलले अक्षयचे वडील भरमा यांच्यावरही श्रेयस आणि त्याच्या मित्रांनी चाकूने वार केले.

 श्रेयसने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरोजी पिता - पुत्रांना कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रेयस, मंजिरी जोशी आणि श्रेयसच्या मित्रांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.