कोल्हापुरात बेकायदेशीर विदेशी दारूचा ११ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाहन अडवलं आणि दारू सापडली...

<p>कोल्हापुरात बेकायदेशीर विदेशी दारूचा ११ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर - ३ सप्टेंबर रोजी एका वाहनातून आंबेवाडीमार्गे विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची दारू आढळून आली. पोलिसांनी वाकरेतील विशाल कांबळे आणि नणंद्रे गावातील युवराज पाटील या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध बँडची सुमारे ३ लाख ८३ हजार रुपयर्याची दारू आणि गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किंमतीचं वाहन असा ११ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दारू लक्ष्मीपूरीतील रोहित वाईन्स येथून खरेदी केली असून ती बांबवडेतील हॉटेलमध्ये विक्रीसाठी नेली जात होती अशी माहिती समोर आलीय.