शियेत स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

सकाळी आंदोलन.. सायंकाळी आंदोलकांवर गुन्हा

<p>शियेत स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शिये येथील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी परिसरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन महावितरण कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी शिये वीज उपकेंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सायंकाळी उशिरा वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 गुन्हा दाखल झालेल्यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, माजी सरपंच रणजीत कदम, दयानंद कांबळे, जयसिंग पाटील, उत्तम पाटील, पांडुरंग मगदूम, बाबासो गोसावी, शहाजी काशीद यासह अन्य आंदोलकांचा समावेश आहे.