मुरगुडमध्ये सव्वा किलो वजनाचा ४१ हजार रुपयांचा गांजा जप्त

<p>मुरगुडमध्ये सव्वा किलो वजनाचा ४१ हजार रुपयांचा गांजा जप्त</p>

कोल्हापूर - पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने कारवाई करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मुरगुडमधील पेट्रोल पंपाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे.

 प्रमोद पांडुरंग भोई असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा ४१ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे