एलसीबीकडून गुटखा कारवाई...दोघांना अटक

कोल्हापूर - जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावरून एका चारचाकी वाहनातून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेशवाडी कुरुंदवाड रोडवरील औरवाड गावच्या हद्दीतून बेकायदेशीर रित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केलीय.
सचिन कौलगे आणि महेश कोरवी अशी त्यांची नावं आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून २६ लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण ३२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.