साक्षीदार झाल्याच्या रागातून दुचाकी पेटवणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

<p>साक्षीदार झाल्याच्या रागातून दुचाकी पेटवणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी</p>

इचलकरंजी - तारदाळ येथील संगमनगरात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी तात्यासो खिलारे हे एका तक्रारीत साक्षीदार झालेत या रागातून गंगा पाटील आणि अब्दुल कय्यूम तांबोळी हे दोघे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खिलारे यांच्या घरी गेले. दोघांनी खिलारे यांना साक्षीदार का झालास असे म्हणत त्यांनी दारातील दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. या बाबतची फिर्याद खिलारे यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी पाटील आणि तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.