कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतूक करणारे दोघे अटकेत; सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना कोल्हापूर महापालिका चौकातील माळकर तिकटी परिसरातून अटक केली आहे. पुरुषोत्तम राणे आणि संदेश राणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि मद्यसाठा असा सुमारे सव्वा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अंमली पदार्थ व मद्य तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने एलसीबीने ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सर्जे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे अंमलदार आबिद मुल्ला, संतोष कुंभार, प्रीतम मिठारी यांनी सहभाग घेतला.