पुतळ्यावर रंग फेकल्या प्रकरणी मुंबई पोलिसांची ८ पथके तैनात

मुंबई – आज स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा प्रकार घडल्याने मुंबईत तणावाची परिस्थिती आहे. या प्रकारानंतर अनेकांनी स्मृती स्थळाला भेट दिली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या रंग फेकल्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासासाठी मुंबई पोलिसांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रंग फेकलेल्या अज्ञान व्यक्तीचा शोध घेत आहेत.