फुलेवाडी खून प्रकरणी आणखी तिघा संशयितांना अटक...

<p>फुलेवाडी खून प्रकरणी आणखी तिघा संशयितांना अटक...</p>

कोल्हापूर - फुलेवाडी रिंगरोडवरील गंगाई लॉन नजीकच्या नृसिंह कॉलनीत महेश राख हा राहत होता. आदित्य गवळी याची पत्नी कस्तुरी हिला काही दिवसापूर्वी महेश राख यानं आपल्या घरी आणून ठेवलं होत राख हा गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा महेश राख यांच्याशी वारंवार वाद होत होता. शुक्रवारी रात्री उशिरा सिद्धार्थ गवळी आदित्य गवळी आणि त्यांच्या सहा ते सात सहकाऱ्यांनी मिळून महेश राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी ओंकार शिंदे यांच्या घराजवळ गाठून राख याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी यांच्यासह त्याच्या सहा ते सात साथीदारांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 सोमवारी करवीर पोलिसांनी राख याच्या खून प्रकरणी ५ संशयितांना अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा यातील आदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा या तिघांना अटक केली होती. दरम्यान या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. या प्रकरणातील मुख्य संशयित सिद्धार्थ गवळी आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.