फुलेवाडी खून प्रकरणी चौघांना अटक...
पाच दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर - फुलेवाडी रिंगरोड वरील गंगाई लॉन जवळच्या नृसिंह कॉलनीत प्रकाश राख हा राहत होता. आदित्य गवळी याच्या पत्नीला काही दिवसापूर्वी राख यानं आपल्या घरी आणून ठेवल होतं. राख हा गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा प्रकाश राखशी वारंवार वाद व्हायचा. शुक्रवारी रात्री उशिरा सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या सहा ते सात सहकाऱ्यांनी मिळून तलवार , एडका, फायटर, लोखंडी गज घेवून राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी ओंकार शिंदे यांच्या घराजवळ गाठून राख याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ, आदित्य यांच्यासह त्याच्या सहा ते सात साथीदारांविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आज करवीर पोलिसांनी राख याच्या खून प्रकरणी पियुष पाटील, मयूर कांबळे, सोहम शेळके, बालाजी देऊळकर आणि जुनेद पटेल या पाच जणांना अटक केलीय. न्यायालयाने या पाचही जणांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
दरम्यान आज सायंकाळी उशिरा करवीर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आदित्य गवळी याच्यासह सद्दाम कुंडले, धीरज शर्मा यांना ताब्यात घेतले आहे.