अशोक खरात प्रकरणी एसआयटीने दिली सविस्तर माहिती... 

 

एसआयटीकडे ९ गुन्ह्यांचा तपास सुरु : तेजस्विनी सातपुते   

<p>अशोक खरात प्रकरणी एसआयटीने दिली सविस्तर माहिती... </p>

<p> </p>

मुंबई – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरु आहे.  याबाबत आज पत्रकार परिषद घेवून एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी सविस्तर माहिती दिली. 
तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले कि, अशोक खरात प्रकरणी २४ पोलीस अधिकाऱ्यांची टीम चौकशी करत आहे.  या प्रकरणी १२ गुन्हे दाखल झाले असून ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. यामध्ये ८ गुन्हे हे  महिला लैंगिक अत्याचाराच्या आहेत. त्‍याचबरोबर अंधश्रद्धा, सावकारी, आर्थिक फसवणूक प्रकरणाचे गुन्हे दाखल करण्‍यात आले आहे. यासाठी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी केली आहे. या संबंधित सोशल मिडीयावर असणारे ४ हजार ४५० लिंक सायबर टीमने शोधून काढले असल्याचे त्यांनी सांगितले. 
खरात हा पीडित महिला आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा भासवत होता. अंधश्रद्धा पसरविण्याचं काम करत होता, असेही तपासात निष्‍पण झाल्‍याचे सातपुते यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी लोकप्रतिनिधींना चौकशीला का नाही बोलवलं यावर सातपुते यांनी सांगितले कि,  फिर्यादी आणि आरोपी सांगतो त्यानुसार चौकशी होत आहे. ज्या लोकांचा संबंध येईल त्यानुसार त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले.