वारणा नदीत बुडालेल्या नवे पारगावमधील युवकाचा ३६ तासानंतर मृतदेह सापडला...
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावमधील संकेत रंगराव कांबळे हा युवक आणि त्याच्या इतर दोन मित्रांसोबत पन्हाळा आणि वाळवा तालुका दरम्यानच्या वारणा नदीवरील चिकुर्डे धरण येथे शुक्रवारी दुपारी पोहोचण्यासाठी गेला होता. नदी पात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पोहत गेला मात्र नंतर तो पाण्यातील बोहऱ्यामध्ये अडकल्याने त्याला पुन्हा नदीपात्रातून बाहेर येता आले नाही ही बाब त्याच्या मित्रांना लक्षात येताच त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला शनिवारी दिवसभर आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर आणि सांगलीच्या कर्मचाऱ्यांनी वारणा नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली. मात्र सायंकाळपर्यत त्याचा ठावठिकाणा लागला नाही, आज सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापनपणाकडून वारणा नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर ३६ तासानंतर संकेतचा मृतदेह वारणा नदीतून बाहेर काढला संकेतचे महाविदयालयीन शिक्षण पूर्ण झाले असून तो नोकरीच्या शोधात होता, त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे त्याच्या अपघाती मृत्यूमुळे पारगाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.