कबनूरजवळ खानावळीत चोरी...दीड लाखांचे साहित्य लंपास

<p>कबनूरजवळ खानावळीत चोरी...दीड लाखांचे साहित्य लंपास</p>

इचलकरंजी  - इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गावात गेल्या काही दिवसांपूर्वी आकाश गांजवे यांनी गांजवे घरगुती मांसाहारी खानावळ सुरू केली आहे. बुधवारी सायकांळी खानावळ बंद करून गांजवे आपल्या घरी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खानावळीचा कडी कोयंडा तोडून पाच सिलेंडर, ३०० ताटे, ६०० वाट्या, प्लेटा तसेच जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी भांडी आणि जेवणाचे सर्व साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. अंदाजे दीड लाख रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आकाश गांजवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान केली आहे.