फरार असलेल्या मोक्का आरोपीला एलसीबीकडून अटक
कोल्हापूर – कळंबा येथे राहणारा विजय रामचंद्र गौड हा मोक्का आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. दरम्यान विजय गौड हा साने गुरुजी वसाहत परिसरातील तलवार चौक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवार चौक परिसरात सापळा रचून आरोपी विजय गौड याला जेरबंद केले आहे.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील आणि अमित मर्दाने यांनी या कारवाई सहभाग घेतला.