जुना राजवाडा पोलिसांनी वर्षभरात गहाळ झालेले मोबाईल संबंधितांना केले परत...

<p>जुना राजवाडा पोलिसांनी वर्षभरात गहाळ झालेले मोबाईल संबंधितांना केले परत...</p>

कोल्हापूर - जुना राजवाडा पोलिसांनी गेल्या वर्षभरात सण, उत्सव आणि मिरवणुकीवेळी गहाळ झालेले चाळीस मोबाईल संच शोधून काढले आहे. सुमारे सात लाख रुपये किंमतीचे हे मोबाईल आज पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते संबंधित फिर्यादीना परत देण्यात आले आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीत गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि शिवजयंती मिरवणुकीदरम्यान अनेकांचे मोबाईल संच गहाळ झाले होते. मोबाईल गहाळ झालेल्या लोकांनी या संदर्भात जुना पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. जुना राजवाडा पोलिसांनी गेल्या वर्षभरात गहाळ झालेले चाळीस मोबाईल संच शोधून काढले आहेत. सुमारे सात लाख रुपये किंमतीचे हे मोबाईल आज शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादीना परत देण्यात आले आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार निलेश नाझरे, वैभव खोत, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, प्रदीप सावंत  आणि मोहन लगारे यांनी गहाळ मोबाईल संच शोधण्याकामी परिश्रम घेतले आहे.