बोरपाडळे येथे एक्साईजची कारवाई...
बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे येथे कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केलीय. दशरथ कुंभार आणि जयदीप कांबळे अशी त्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बोरपाडळे येथे कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दशरथ कुंभार आणि जयदीप कांबळे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी असा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निरीक्षक व्ही. आर. शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.डी. गोसावी, एस.आर गायकवाड, एस आर ठोंबरे, के एम पाटील, ए.ए कारंडे, जे आर शिनगारे, एम.डी.पाटील, एम पी पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.