शाहूपुरी पोलिसांनी चोरीला गेलेले २१ मोबाईल शोधून संबंधितांना केले परत...
कोल्हापूर – शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी गेल्या वर्षभरात अनेकांचे मोबाईल संच गहाळ झाले होते. याबाबत संबंधितांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी गहाळ झालेले २१ मोबाईल संच ट्रेसिंग करून शोधून काढले आहेत.
आज अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या उपस्थितीत संबंधितांना सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे मोबाईल संच परत देण्यात आले आहे. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार मिलिंद बांगर, रवीकुमार आंबेकर, भैरू माने, सनीराज पाटील, सुशील गायकवाड, राहुल पाटील, महेश पाटील, अमोल पाटील, बाबासो ढाकणे, अमर अडसुळे, रवींद्र पाटील यांनी मोबाईल संच शोधण्यासाठी परिश्रम घेतले.