इचलकरंजीतील वजीर गैंग वर्षभरासाठी कोल्हापूर जिल्हयातून हद्दपार...
इचलकरंजी - शहर आणि परिसरात सामाजिक शांतता बिघडवत असल्याबद्दल इचलकरंजीमधील वजीर गैंग विरोधात इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या गँगच्या सदस्यांकडून इचलकरंजी शहर आणि परिसरात सार्वजनिक शांततेला बाधा आणली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने या गैंगला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या गैंग मध्ये सूरज बन्ने, संकेत नाकाडे, अंकुश हल्लोळी, सुधीर मडिवाळ, तेजस कुरणे या पाच जणांचा समावेश आहे.