जयसिंगपूरमधील आर. के गँगचे पाच जण कोल्हापूर, सांगलीतून हद्दपार...
कोल्हापूर - जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक हिताला बाधा आणणे, अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, सामाजिक शांतता बिघडवणे याबद्दल जयसिंगपूरातील राहुल कांबळे याच्या आर. के. गैंग विरोधात जयसिंगपूर पोलिसांनी पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ही गैंग एक वर्षासाठी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे. गँगचा म्होरक्या राहुल कांबळेसह राहुल पवार, इक्बाल इनामदार, दीपक गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.