राजारामपुरीतील नवश्या मारुती मंदिराजवळ गॅस स्फोट... भीषण आग
कोल्हापूर - राजारामपुरी येथील नवश्या मारुती मंदिर परिसरात गॅस स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आल्याने आजूबाजूचा परिसर हादरला आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.