‘या’ गावातील सराफ दुकानात ‘बुरखा - घुंघट’ घालणाऱ्या महिलांना नो एट्री
झांसी - सध्या सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.त्यातच सोने चोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे सोने चोरीच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश मधील झांसी येथील सोनारांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
झांसीच्या सराफा बाजारा जर दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला बुरखा आणि घुंघट न घालताच यावं लागेल’ अशा आशयाच्या सूचना फलक सर्व दुकानाबाहेर लावल्या आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर तुमचा चेहरा दिसल्यानंतरच दागिने खरेदी करता येणार आहेत. पोलिसांकडून या अटींना परवानगी देण्यात आली आहे. आता या नियमांमुळे सोने चोरीच्या घटना रोखण्यात किती यश मिळते पाहावे लागेल.