गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक... 

एलसीबीची चिपरी फाट्याजवळ कारवाई

<p>गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक... </p>

कोल्हापूर - अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

 या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिपरी फाटा येथे  सापळा रचून सांगली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या वैभव आवळे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा सुमारे एक लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभव आवळे याच्यावर सांगली जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.