व्यावसायिक स्पर्धेतून छायाचित्रकाराला चाकू धाक दाखवून लुटलं... 

सहा जणांना अटक...

<p>व्यावसायिक स्पर्धेतून छायाचित्रकाराला चाकू धाक दाखवून लुटलं... </p>

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील सुरज गोडसे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. रंकाळा टॉवर परिसरात त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. व्यावसायिक स्पर्धेतून गोडसे आणि राहुल कोरवी यांच्यात वाद झाला होता. या वादातून कोरवी यांने यश माने याच्यासह त्याच्या साथीदारांनी कट रचून गोडसे याला धमकवण्यास सांगितले होते. गुरुवारी गोडसे याला क्रशर चौक परिसरात अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील प्रोफेशनल कॅमेरा, लेन्स असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटला होता.

या प्रकरणी गोडसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यश माने, महंमदकैफ हैदर, सिद्धेश पांडव, राहुल कोरवी, पृथ्वीराज कदम, रोहित बिरंजे या सहा जणांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. आज यश मानेसह ६ संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.