दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून...
एकत्र दारू ढोसली.. .आईवरून शिवी दिली आणि...
कोल्हापूर - मूळचा शाहूवाडी तालुक्यातील विकास भोसले हा कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात राहत होता. त्याचे कुटुंबीय मूळ गावीच राहत आहे. विक्रम नगर परिसरात राहणाऱ्या ओंकार काळेशी त्याची मैत्री होती. शनिवारी रात्री दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र गेले होते. यावेळी गप्पा मारत बसल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून ओंकार काळे याने विकास भोसले याच्या डोक्यात दगड घालून त्याचा शनिवारी रात्री विक्रमनगरमधील जोशी गल्लीत खून केला.
या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ओंकार काळे याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील हे अधिक तपास करत आहेत.