31 डिसेंबर दिवशी कळंबा कारागृहात मारामारी...एक जण जखमी
कोल्हापूर – शहरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यामध्ये मारामारी झाली आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. ही मारामारी थर्टी फर्स्ट दिवशी म्हणजे बुधवारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारागृहातील न्यायालयीन बंदी अजय पाथरवट हा सर्कल नंबर पाच बरॅक क्रमांक एक जवळ उभा असताना न्यायालयीन बंदी आकाश उर्फ अक्षय माळी आणि निलेश माळी या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. यात अजय पाथरवट हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आकाश माळी आणि निलेश माळी यांच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.