पोलिसांनी ‘त्या’ पाच संशयितांना कोल्हापूर शहरातून फिरवलं...

<p>पोलिसांनी ‘त्या’ पाच संशयितांना कोल्हापूर शहरातून फिरवलं...</p>

कोल्हापूर – शहरातील राजारामपुरी परिसरात राहणारे सम्राट शेखर पाटील आणि विवेक मेस्त्री या दोघांना किरकोळ कारणावरून सहा जणांनी मारहाण केली होती. महापालिका निवडणूकीची आचारसंहिता लागू असताना शहरात सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी सम्राट पाटील यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पार्थ पाटील, ऋषिकेश इंद्रेकर, श्रेयश पोळ, साहिल देसाई, समर्थ स्वामी या पाच जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान बुधवारी रात्री पोलिसांनी या पाच जणांना पोलिसी खाक्या दाखवत राजारामपूरी परिसरातून तपासासाठी फिरवले. यावेळी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.