कोल्हापुरात थर्टी फर्स्टला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई...
२ लाख दंड वसूल
कोल्हापूर - थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात बुधवारी सायंकाळी विशेष मोहिम राबवली होती. यामध्ये ३८ जणांवर ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत तर एकशे सत्याहत्तर वाहनधारकांवर ट्रिपल सीट, विना लायसन्स वाहन चालवल्या बद्दल, अठरा जणांवर मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याबद्दल तसेच कर्कश्श आवाज करत वाहन चालवल्याबद्दल चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय नो पार्किंगमध्ये वाहने पार्किंग करणाऱ्या आणि सिग्नल तोडून वाहन चालवणाऱ्या ८९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकूण ३२६ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्यावर २ लाख १२ हजार ६०० रुपये इतक्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर परिसरात विशेष मोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली आहे.