तावडे हॉटेल परिसरात भरधाव कारने तिघांना चिरडलं...

<p>तावडे हॉटेल परिसरात भरधाव कारने तिघांना चिरडलं...</p>

कोल्हापूर – आज पहाटेच्या सुमारात तावडे हॉटेल परिसरात भरधाव कारने तिघांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेकोटीजवळ तिघे उभे असताना कारने त्यांना धडक दिली आहे. शाहूपुरी पोलीसांकडून तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.