लखन बेनाडे खुन प्रकरणातील संशयिताला अटक
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा आजरा येथील जंगलात खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे हिरण्यकेशी नदीत टाकण्यात आले होते. या खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अकरा संशयितांना अटक केलीय.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये सुभाषनगरमध्ये राहणारा संशयित महमंद दस्तगीर कच्छी याचे नाव निष्पन्न झाले होते. त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग निश्चित झाल्यानंतर तो पसार झाला होता त्याचा शोध सुरु असताना तो सुभाषनगर भागात आला असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुभाषनगर परिसरात सापळा रचून कच्छीला अटक केली आहे. संशयित महमंद दस्तगीर कच्छी याला न्यायालयाने तीन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.