कागल - मुरगुड रस्त्यावर अपघात... दोघे गंभीर जखमी

<p>कागल - मुरगुड रस्त्यावर अपघात... दोघे गंभीर जखमी</p>

कोल्हापूर – कागल - मुरगुड रस्त्यावरील पिंपळगाव खुर्द आवटे मळा येथे धान्याने भरलेला टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.