धक्कादायक : रंकाळ्यावर भानामतीचा प्रकार... 

<p>धक्कादायक : रंकाळ्यावर भानामतीचा प्रकार... </p>

कोल्हापूर -  शहरातील रंकाळा परिसरात भानामतीचा प्रकार घडला आहे. आज सकाळच्या दरम्यान रंकाळा येथील  गार्डनमध्ये लाल रंगाच्या कापडामध्ये काळी बाहुली आणि लिंबू सापडला आहे. 
दररोज हजारो पर्यटक आणि कोल्हापूरकर रंकाळा तलाव परिसरात फिरायला येतात असं असताना अशा वर्दळीच्या ठिकाणी करणी, भानामतीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. असे कृत्य केलेल्या त्या संबंधितांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.