एक्साईजनं वर्षभरात विविध कारवायांमध्ये पावणे आठ कोटींचा मुद्देमाल केला जप्त
कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या वर्षभरात मद्याची बेकायदेशीरत्या वाहतूक, देशी तसंच विदेशी बनावट मद्याची निर्मिती, मद्य तस्करी, साठवणूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई केलीय. कोल्हापूर विभागीय अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या सीमा भागातील मार्गावरही सापळा रचून राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं कारवाई केलीय. याशिवाय बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापेमारी केली. ग्रामीण भागात असणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करत गावठी हातभट्टीचे दारू अड्डे उध्वस्त केलेत. वर्षभरात मद्य तस्करी, विक्री, साठवणूक आणि बनावट मध्ये निर्मिती करणाऱ्या सुमारे २ हजार ५४४ जणांवर गुन्हे दाखल करत २ हजार ३९७ आरोपींना अटक केली. मद्यतस्करी मध्ये वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी आणि चारचाकी अशी एकूण २२९ वाहनं जप्त केलीयत वर्षभरात तब्बल सात कोटी ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलीय.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोनशेहून अधिक जास्त गुन्हे दाखल केलेत तर तब्बल दोन कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय