लक्षतीर्थ वसाहतीत अज्ञातांकडून दुचाकी जाळली

<p>लक्षतीर्थ वसाहतीत अज्ञातांकडून दुचाकी जाळली</p>

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील रेडेकर गल्ली परिसरात अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या परिसरात राहणारे मारुती गडदे यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला आग लावल्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. या प्रकरणी मारुती गडदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.