तब्बल सव्वा पाच कोटींची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी केली जप्त 

<p>तब्बल सव्वा पाच कोटींची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी केली जप्त </p>

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना पुणे बेंगलोर महामार्गावरून व्हेल माशाच्या उलटीची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी जवळच्या पेट्रोल पंपाच्या परिसरात सापळा रचला व्हेल माशाच्या उलटीची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केलीय. पोलिसांनी या तिघांकडून पाच किलो वजनाची आणि पाच कोटी २४ लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी, एक दुचाकी, आणि एक चार चाकी असा सुमारे पाच कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, अंमलदार परशुराम गुजरे, संतोष बर्गे, सागर चौगुले, योगेश गोसावी, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय हूंबे , समीर कांबळे, गजानन गुरव, विनायक चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.