कोल्हापुरात देवपूजेतील अडीच लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले...

<p>कोल्हापुरात देवपूजेतील अडीच लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले...</p>

कोल्हापूर - शहरातील वाय पी पोवार नगर चौकात नितीन गोपाळ बेंद्रे हे कुटुंबियांसमवेत राहतात. १८ डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार असल्याने त्यांनी घरी लक्ष्मी पूजन केली होती. यावेळी पूजेत देवीला सोन्याचे दागिने घातले होते. चोरट्याने बेंद्रे कुटुंबियांची नजर चुकवून पूजेत ठेवलेले दोन लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी बेंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.