थर्टी फर्स्टच्या पार्टीवर पोलिसांची राहणार नजर...

<p>थर्टी फर्स्टच्या पार्टीवर पोलिसांची राहणार नजर...</p>

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झालेत. यानिमित्त मेजवानीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  मात्र या कार्यक्रमांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे.

अवैद्य मद्यसाठा आणि त्याची वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आजपासून पाच जानेवारीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सात सीमा तपासणी नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. तसेच नऊ भरारी पथकांचीही करडी नजर असणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून ३१ डिसेंबर साजरा करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे.

थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी १ लाख ९० हजार एक दिवसाचे मद्य सेवन परवाने वितरीत करण्यात आले आहे. कोठेही अवैद्य मद्य वाहतूक  साठा अथवा विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.