जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी...व्हिडीओ व्हायरल 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.  
शिरोळ तालुक्यातील उदगावमधील वाद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पोहोचला होता. यावेळी एकमेकांना उचलून जमिनीवर आपटत तसेच लाथा बुक्क्यांनी ही हाणामारी झाली आहे.  या हाणामारीत महिला सुद्धा असल्याचे दिसून येत आहे. यावेळी जयसिंगपूर पोलिसांनी हस्तक्षेप करत हाणामारी रोखली.