या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नाही...

ही बाब निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित : सुप्रीम कोर्ट  

<p>या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नाही...</p>

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या  50 टक्के आरक्षण मर्यादावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही बाब निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित आहे, त्यामुळे सर्व तथ्ये समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल, असे म्हणत पुढील सुनावणी मंगळवारी घेतली जाईल असे सांगितले आहे. तसेच या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नसल्याचेही म्हटले आहे.  

50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, नाही तर निवडणुकाच रोखू, असा इशारा कोर्टाने मागील सुनावणीत दिला होता. त्या मुद्द्याकडे कोर्ट गांभीर्याने पाहत आहे. ‘महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही, कारण आरक्षण निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याचे यावेळी राज्य सरकारने कोर्टाला सांगितले आहे.